कोणत्याही स्पर्धा परीक्षेत General Awareness (Current affairs) हा महत्वाचा विषय असतो आणि याला धरून परीक्षेच्या syllabus नुसार विषयांचे प्रश्न विचारले जातात.
आजची पोस्ट MPSC Geography या विषयासंबंधित चालू घडामोडीवर आहे.
आज आपल्या MPSCTricks.in च्या या लेखात आपण इंडोनेशिया देशात काही दिवसांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकाबद्दल वाचणार आहोत (Semeru volcanic eruption in marathi). हा जगाचा भूगोल मधील महत्वाचा topic असणार आहे.
चला तर मग सुरू करूया. Semeru earthquake in marathi बाबत माहिती.
इंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखी- माउंट सेमेरू | Semeru volcano in Marathi
आशिया खंडाच्या पूर्वेकडे असणाऱ्या इंडोनेशिया देशातील पूर्वीय जावा या दाट लोकसंख्या असणाऱ्या बेटावर माऊंट सेमेरू (Mount Semeru) या क्रियाशील ज्वालामुखी काल दिनांक 5 डिसेंबर रोजी पुन्हा सक्रिय झाला. आसमंतात प्रचंड राखेचा धूर पसरल्याने सगळीकडे काळोख पसरला होता. ज्वालामुखीच्या आसपासच्या घरांवर राखेचा धूर पसरला होता.
सेमेरू मधील मेरू चा अर्थ ‘पर्वत’ असा होतो. सेमेरू चा दुसरा अर्थ महामेरू असा देखील होतो. संस्कृत भाषेत याचा अर्थ ‘प्रचंड मोठा पर्वत’- The Great Mountain असा होतो. सेमेरू हा Stratovolcano प्रकारचा ज्वालामुखी आहे.
मागील २०० वर्षात सेमेरूचा अनेक वेळा उद्रेक झाला आहे.
इंडोनेशियातील अन्य ज्वालामुखी
मेरापी ज्वालामुखी- Merapi volcano(Java) आणि सीनाबंग ज्वालामुखी- Sinabung volcano(Sumatra). हे देखील मागील काही दिवसांत उद्रेक झाले.
इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त सक्रिय ज्वालामुखी असलेला देश आहे. Pacific Ring of Fire मधे इंडोनेशियाचा भाग येत असल्यामुळे हा प्रदेश ज्वालामुखी सक्रिय आहे.
पॅसिफिक रिंग ऑफ फायर:
पॅसिफिक रिंग ऑफ फायर, ज्याला सर्कम-पॅसिफिक बेल्ट असेही संबोधले जाते, हा पॅसिफिक महासागराच्या बाजूचा एक पट्टा आहे ज्यामध्ये सक्रिय ज्वालामुखी आणि वारंवार भूकंप होतात.
Mount Semeru in marathi या लेखात आपण इंडोनेशिया देशातल्या सक्रिय ज्वालामुखी बद्दल माहिती घेतली. माहिती आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.