Anil Menon SpaceX: नासाच्या Moon mission मधे भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश.

आज MPSC Tricks च्या आजच्या लेखात आपण व्यक्तिवेध घेणार आहोत. विज्ञान-तंत्रज्ञान विषयांसंबंधीत अनेक प्रश्न (जसे व्यक्ती, Important Facts) MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेत विचारले गेलेले आहेत. त्या दृष्टीने अनिल मेनन यांची निवड महत्वाची आहे. anil menon nasa in marathi या लेखात आपण त्यांची माहिती घेणार आहोत.

अमेरिकेन अंतराळ संस्था- नासा (NASA- National Aeronautics and Space Administration) येत्या काळात चंद्रावर पुन्हा एकदा मनुष्य पाठविण्यात येणार आहे. मात्र यावेळी अंतराळवीर चंद्रावर आधीपेक्षा अधिक वेळ व्यतित करतील. याही पुढे मंगळ ग्रहासाठी तयारी नासाची असेल. नासाने यासाठी १० अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय वंशाचे अंतराळवीर डॉ. अनिल मेनन यांचे देखील नाव आहे. भारतीय वंशाचे डॉ. अनिल मेनन, Elon Musk यांच्या SpaceX चे पहिले फ्लाइट सर्जन आहेत | anil menon spacex|, आणि पुढे NASA च्या २०२२ च्या अंतराळ कार्यक्रमात भाग घेतील.

चांद्रमोहिमेच्या आधी या सर्व अंतराळावीरांना सुसंगत प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना सुरवातीला आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS- International Space Station) वर पाठवण्यात येईल. ISS वर काही प्रयोग करून अंतरवीरांना चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. पुढे ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत. 

अनिल मेनन यांच्या बाबत माहिती:

भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा जन्म युक्रेनमध्ये झाला. ते यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून तैनात आहेत. NASA च्या SpaceX Demo-2 मोहिमेदरम्यान वैद्यकीय संस्था तयार करणारे ते पहिले SpaceX फ्लाइट सर्जन होते. डॉ मेनन यांना आधीच NASA मध्ये फ्लाइट सर्जन म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. अनिल मेनन सध्या वय 45, हे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत.

NASA प्रोफाइलनुसार, मेनन यांनी 2010 मधे हैती भूकंप, 2015 नेपाळ भूकंप आणि 2011 मधे रेनो एअर शो क्रॅश दरम्यान मदत केली होती. त्यांनी 1999 मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये बॅचलर पदवी आणि 2004 मध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. 2009 मध्ये, त्यांनी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी प्राप्त केली.

डॉ मेनन यांनी न्यूरोबायोलॉजीमध्ये बॅचलर डिग्री आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी इमर्जन्सी मेडिसिन आणि नंतर एरोस्पेस मेडिसिनमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन केले

1999 हार्वर्ड विद्यापीठातून न्यूरोबायोलॉजीमध्ये बॅचलर पदवी
2004 स्टॅनफोर्ड विद्यापीठातून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी
2009 स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमधून डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी

अनिल मेनन यांच्या बाबत अधिक माहितीसाठी त्यांचा Linked.in ची ही लिंक दिलेली आहे.

अफगाणिस्तानातील मेनन यांचे काम

ऑपरेशन एंड्युरिंग फ्रीडमसाठी (दिनांक ७ ऑक्टोम्बर २००१ – २८ डिसेंबर २०१४) त्यांना अफगाणिस्तानात तैनात करण्यात आले होते. माउंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी हिमालयन रेस्क्यू असोसिएशनसाठीही काम केले. मेनन यांनी एरोस्पेस मेडिसिनमधे निवासी म्हणून काम केले. पायलट म्हणून त्यांना 1,000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांची पत्नी ऍना मेनन SpaceX मध्ये काम करतात व त्यांना दोन मुलेही आहेत.

अशीच महत्वाची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. माहिती वाचल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.

Leave a Comment