भारतातील सर्वात मोठी धरणे – Biggest Dams in India in Marathi

भारतात छोटे-मोठे मिळून एकूण 4000 पेक्षा जास्त धरणे आहेत. यातील अनेक धरणांनाचा उपयोग वीज निर्मितीसाठी, सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी किंवा औद्योगिक वापरासाठी केला जातो. भारतातील काही धरणे चित्तथरारक व सुंदर दिसणारे आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. परिसरातील निसर्गरम्य दृश्ये आणि शांततेमुळे ही धरणे पर्यटनासाठी ही लोकप्रिय आहेत.

भारत सरकारने स्वातंत्र्य मिळाल्यापासून आवश्यकता नुसार अनेक धरणांनाचा निर्माण केलेला आहे. यातील धरणांची विशालकाय जल साठवण क्षमता, लांबी, उंची असल्यामुळे हे भारतातील सर्वात मोठ्या धरणांच्या यादीत येतात. आजच्या या लेखात आपण भारतातील सर्वात मोठी धरणांची माहिती पाहणार आहोत. भारतातील सर्वात मोठ्या धरणांची माहिती आपल्याला सामन्य ज्ञानासाठी किंवा एमपीएससी सारख्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते.

भारतातील सर्वात मोठी धरणे – Biggest Dams in India in Marathi

भारतातील एकूण 4000 पेक्षा जास्त धरणांच्या यादीतील सर्वात सर्वात मोठे धरण आहे, टिहरी धरण. तर चला आता याची माहिती पाहुयात.

1) टिहरी धरण

भारतातील सर्वात उंच आणि जगातील आठव्या क्रमांकावर असलेले टिहरी हे उत्तराखंड राज्यातील एक धरण आहे. भागीरथी नदीवर बांधण्यात आलेले हे धरण आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण आहे. 260.5 मीटर उंच आणि 575 मीटर लांब असलेले हे धरण आहे.

टिहरी धरण हे 2005 मध्ये बनून तयार झाले होते. या धरणात 2400 मेगावॉट वीजनिर्मिती होते. यासोबतच सिंचनासाठी ही या पाण्याचा वापर होतो. टिहरी धरणाची पाणी साठवण क्षमता 2,100,000 एकर फूट इतकी प्रचंड आहे.

2) भाखरा नांगल धरण

भाखरा नांगल धरण हे भारतातील दोन नंबर चे सर्वात मोठे धरण आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील मधील बिलासपूर जिल्ह्यात सतलज नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. 167.64 मीटर उंच आणि 518.16 मीटर उंच असलेल्या या धरणाची जलाशय क्षमता 7,501,775 एकर फूट इतकी आहे.

भाखरा नांगर धरण हे 1963 मध्ये देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला समर्पित केले होते. या डॅम च्या जलाशयाला “गोबिंद सागर” असे नाव आहे. भाखरा नांगल धरणातील जलाशयाचा वापर वीजनिर्मिती, सिंचनासाठी केला जात आहे.

3) हिराकुड धरण

भारतातील सर्वात लांब आणि जगातील सर्वात धरणांच्या यादीत असलेले हे धरण आहे. ओडिसा मध्ये महानदी या नदीवर बांधण्यात आलेला हा डॅम आहे. हिराकुड धरण हे भारतातील सर्वात लांब मानवनिर्मित धरण आहे, याची एकूण लांबी 26 किलोमीटर इतकी मोठी आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1957 मध्ये भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या धरणाचे उदघाटन केले. हिराकुड धरणाच्या जलाशय साठ्याला हिराकुड जलाशय असे नाव देण्यात आलेले आहे. धरणाची मुख्य भिंत 4.8 किलोमीटर लांब आहे व 307 मेगावॉट वीज निर्मिती आणि 4,779,965 एकर फूट जल क्षमता या डॅममध्ये आहे.

4) सरदार सरोवर

सरदार सरोवर हे गुजरात राज्यात असलेले एक खूप मोठे व अनेक राज्यांना उपयोगी पडत असलेले हे धरण आहे. नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची 163 मीटर व लांबी 1210 मीटर आहे. धरणातील जलाशयाचा वापर आसपासच्या परिसरात सिंचनासाठी व वीजनिर्मिती साठी केला जातो.

सरदार सरोवर या धरणाला १७ सप्टेंबर 2017 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित केले. सरदार सरोवर या धरणाचा फायदा चार राज्यांना होतो ज्यात गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हि राज्य समाविष्ट आहेत. या धरणात 1450 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते जी खूप प्रचंड आहे व 7,701,775 एकर फूट इतकी पाणी साठवण्याची क्षमता या धरणाची आहे.

5) नागार्जुन सागर धरण

आंध्रप्रदेश राज्यातील नलगोंड जिल्ह्यात हे नागार्जुन सागर धरण आहे. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले हे धरण आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात येते. नागार्जुन सागर धरणाची उंची 124 मीटर आणि 1450 लांबी मीटर आहे. भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव असे याला ओळखले जाते. या धरणातून 816 मेगावॉट विजेची निर्मिती होते व 9,371,845 एकर फूट हि या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता आहे.

नागार्जुन शहर धरण हे आधुनिक भारताच्या स्थापत्य आणि तांत्रिक विजयाचे प्रतीक आहे. धरण बांधताना वापरण्यात आलेली दर्जेदार स्थापत्य कलेमुळे या धरणाला हा दर्जा प्राप्त झाला आहे. दिसायला अत्यंत सुंदर व आधुनिक असलेले हे नागार्जुन सागर धरण हे पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण आहे.

Leave a Comment