नितीन गडकरी यांचे 5 महत्वाचे प्रकल्प

जम्मू काश्मीर मध्ये आशियाचा सर्वात मोठा बोगदा तयार होतोय. झोजीला असे या बोगद्याचे नाव असून त्याची लांबी १४.२ किमी इतकी आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या जम्मू काश्मीर च्या दौऱ्यावेळी या बोगद्याची पाहणी केली. यावेळी गडकरींनी १२१ किमी लांबीच्या चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी देखील केली. झोजी ला प्रकल्प भारताच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे, ज्या साठी६००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार असल्याचे बोलले जाते.

श्रीनगर , कारगिल, लेह मार्गावर असणारा हा बोगदा लदाख लाही जोडणार आहे.
जो भारतीय सैनिकांसाठी महत्वाचा हालचाल मार्ग असणार आहे.
काही महत्त्वाचे प्रोजेक्ट खाली दिले आहेत.

नर्मदा स्टील ब्रिज

हा ब्रिज गुजरात च्या भरुच येथे बांधण्यात आलाय. या ब्रिज चा रेकॉर्ड म्हणजे तो ३२ महिन्यांच्या नियोजित काळामध्ये पूर्ण झालाय. National Highway 08 वर बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी १३४४ मीटर आहे. ज्या साठी ३८९ कोटी रु खर्च करण्यात आले आहेत.

दिल्ली : Three Lane Underpass

यामुळे राजधानीतल्या धौलाकुआ ते गुरुग्राम पर्यंत येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रॅफिक साठी सिग्नलरहीत रस्ता तयार झाला आहे. ११२ दिवसांत हा underpass बांधला गेला आहे. या मुळे दिल्ली करांचा वेळ तर वाचतोच पण ट्रॅफिक चा प्रॉब्लेम ही सुटला आहे. यासाठी जवळपास २७० कोटी रुपये खर्च झाल्याचे समजतंय.

दिल्ली – मेरठ Expressway

हा expressway ९६ किमी चा fast track मार्ग आहे. हा access control fast track expressway ही आहे.
या मार्गावर दिल्ली ते दासना पर्यंत १४ लेन आणि दासना ते मेरठ पर्यंत ६ लेन आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१५ रोजी या मार्गाच उत्तघाटन केलं होतं.

महाराष्ट्रातील मुंबई – नागपूर सुपर एक्सप्रेसवे

यालाच समृद्धी महामार्ग असेही म्हणतात.
एकूण ८ लेन असणारा हा महामार्ग राज्याच्या एकूण १० जिल्यातुन जातो.
याची लांबी एकूण ७०१ किमी असून रुंदी १२० मी आहे.
यामुळे जिथे मुंबई- नागपूर प्रवासासाठी पूर्वी १८ तास लागायचे ते आता ८ तास लागणार आहेत.
समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी National/State Highway ला छेदतो तेथे कृषी केंद्र ही उभारण्यात येणार आहे. ज्या मुळे कृषी क्षेत्रात मोठी मदत होईल.
सध्या महामार्गाचे काम ७०-८० % पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२२ मध्ये काम पूर्ण होईल असे अधिकृत स्थळावर सांगण्यात आले आहे.

दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे

हा देशातील सर्वात लांब आणि १२ पदरी एक्सप्रेसवे असणार आहे. देशातल्या ६ राज्यांमधून जाणाऱ्या या एक्सप्रेसवे ची लांबी १३८० किमी असणार आहे. ज्या साठी जवळपास १लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
येत्या मार्च २०२२ पर्यंत हा महामार्ग खुला केला जाईल अशी माहिती आहे.

Leave a Comment