NCB, ED, IT, NIA, CBI आणि IB ची माहिती

केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या तपास यंत्रणा

केंद्राच्या नाही म्हटल तरी डझन च्या वर तपास यंत्रणा असतील. त्यामुळं सगळ्यांचीच माहिती घेण्यापेक्षा राज्यात सध्या चर्चेत असण्याऱ्या NCB, ED, IT, NIA, CBI आणि IB ची माहिती घेऊया.

1. Narcotics Control Beaureu – (NCB)

अंमली पदार्थांचे सेवन आणि वाहतूक रोखण्यासाठी Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 या कायद्याची मदत घेतली जाते. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रिय पातळीवर एखादी यंत्रणा असावी अशी तरतूद करण्यात आली होती. त्यातूनच १७ मार्च १९८६ ला Narcotics Control Beaureu (NCB) या संस्थेची स्थापना झाली.

अंमली पदार्थांचे सेवन करून जे गुन्हे घडतात त्या बद्दल च्या कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय साधण्याच काम ही संस्था करते.

NCB ची विभागीय आणि उपविभागीय कार्यालय भारतभर पसरली आहेत. ही कार्यालय देशातून अंमली पदार्थ जप्तीची सर्व माहिती गोळा करतात. NCB ला एक पूर्ण वेळ महासंचालक आणि पाच उपमहासंचालक असतात.

2. Enforcement Directorate (ED) – अंमलबजावणी संचालनालय

ED ची स्थापना १ मे १९५६ ला करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्याला आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही देशात आर्थिक कायद्याचे व्यवस्थापन करणारी संस्था आहे. ED संस्था ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते. ही एक Economics Intelligence Agency आहे. देशातील हवाला, मनी लौंडरिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ED लक्ष ठेवून असते. दिल्लीत ED चे मुख्यालय आहे.

3. Income Tax Department (IT Dept) – आयकर विभाग

चार-पाच दिवसांपूर्वी सध्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीच्या कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले. आर्थिक गुन्हे घडले असतील तर आयकर विभाग आणि ED छापे टाकते. भारतात एखादी व्यक्ती, कार्यालय किंवा संस्था यांनी काही ठराविक उत्पन्न नंतर कर भरावा लागतो.

त्या साठी देशात करप्रणाली आहे. हाच कर काही लोक चुकवतात आणि तो पैसा दुसऱ्या मार्गाने वळवतात, गुंतवणूक करतात आणि संपत्ती घेतात. हे सर्व करत असताना त्यांनी कर चुकवलेला असतो. त्यामुळे हे गैरप्रकार बाहेर काढण्यासाठी भारतात आयकर विभाग काम करतो. एखाद्या व्यक्तीने, कंपनीने, कार्यालयाने कर चुकवला असल्यास आयकर विभाग छापे टाकते.

4. National Investigation Agency (NIA) – राष्ट्रीय तपास यंत्रणा

२६/११ चा दहशतवादी हल्ला हा संपूर्ण भारतासाठी दुःखाचा दिवस आहे. हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश मानले गेले. आणि केंद्रीय पातळीवर दहशतवादी घटनांचा तपास करणारी यंत्रणा असावी यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री पी.चदंबरन यांनी NIA ची स्थापना केली होती.

NIA च मुख्य काम हे देशभरात घडलेल्या दहशतवादी घटनांची चौकशी करणे आहे. देशाचे गृहमंत्री हे या संस्थेचे प्रमुख असतात. त्यामुळे या संस्थेचे सध्या प्रमुख अमित शाह हे आहेत. देशात कोणत्याही राज्यात दहशतवादी घटना घडली तर त्याच्या तपासाची जबाबदारी NIA कडे असते. या तपासासाठी NIA ला कुठल्याही संबंधित राज्याच्या परवानगीची गरज नसते. तसेच ज्या आरोपींना अटक केलं जातं त्याच्यावर NIA च्या विशेष कोर्टात केस चालवली जाते.

अमेरिकेत ज्या प्रमाणे FBI चं काम चालत त्याच धरतीवर भारतात NIA च काम चालत.

5. Central Bureau of Investment (CBI) – देशातील सर्वात जुनी तपास यंत्रणा.

दुसऱ्या महायुद्धावेळी युद्धासाठी लागणारी सामुग्री उत्पादन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतात मोठी कंत्राट(contract) दिली होती. अशा सामुग्रीची देवाण-घेवाण होत असताना भ्रष्टाचार होत असल्याचं उघडकीस आलं. ते थांबवण्यासाठी ब्रिटिश सरकारने Special Police Establishment act (SPE ACT) नावाचा भ्रष्टाचार विरोधी कायदा संमत केला.

 दुसरे महायुद्ध संपल्यानंतर देशातील केंद्रीय पातळीवरील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एका केंद्रीय संस्थेची गरज भासू लागली. तेव्हा १९४६ मधे कायद्यात सुधारणा करुन Delhi Special Police Establishment Act 1946 हा कायदा करण्यात आला. पुढे १९६३ मधे औपचारिकरित्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण म्हणजेच CBI विभागाची स्थापना झाली.

CBI स्थापन झाल्यानंतरच्यासंस्थेला पुरेसे अधिकार देण्यात काही वर्षे जावी लागली. तो पर्यंत ही संस्था केवळ भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्हे यांचाच तपास करत होती. १९६५ साली काही अधिकार दिल्यानंतर ही संस्था आणखी शक्तिशाली बनली तेव्हापासून हत्या, दहशतवादी हल्ले, अपहरण यांसारख्या अनेक गुन्ह्यांचे तपास ही संस्था करू लागली.

CBI देशातील गुन्ह्यांचा तपास करणारी सर्वात मोठी संस्था आहे. सर्व high प्रोफाईल केसेस या संस्थेकडे दिल्याचं पाहायला मिळत.

CBI चा राजकीय वापर होतो, CBI ला स्वायत्तता नाही असे अनेक आरोप या संस्थेवर होतच असतात.

6. Intelligence Bureau (IB)

कोणत्याही देशात देशांतर्गत एक गुप्तचर यंत्रणा असते आणि त्या सोबत देशाबाहेरील माहिती मिळवणारी संस्था असते.

उदा. अमेरिकेत FBI आणि CIA

आपल्याकडे त्या आहेत IB आणि RAW.
IB ही देशांतर्गत सुरक्षेकडे लक्ष देणारी गुप्तचर संस्था आहे. ही संस्था ब्रिटिश भारतामध्ये जन्माला आली आहे. पण तरीही तेव्हा पासून आत्ता पर्यंत IB ला वेगळं अस अस्तित्व नाही. IB केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत भाग/विभाग आहे.
IB चं नेमकं काम काय असत?
IB नेमकं कसं काम करत?
IB ने आत्ता पर्यंत नेमक्या कोणत्या कामगीरी फत्ते केल्यात?

याची माहिती कुणालाही कळत नाही. या खात्याचा कारभार एका BLUE BOOK नुसार चालतो असं म्हणतात. पण हे BLUE BOOK अनेक वर्षे त्या खात्यात नोकरी केलेल्या व्यक्तीनेही बघितलेले नाही.

Leave a Comment