MPSC Rajyaseva Prelims Practice Question Paper 2020

1. जोड्या जुळवा :

(a) पेशवे(i) इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानातील
प्रयोगांसाठी प्रयोगशाळा बांधली.
(b) महाराज सवाई जयसिंग(ii) यांच्या दरबारात युरोपीयन डॉक्टर आणि विद्वान होते.
(c) रघुनाथ नवलकर(iii) पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोल शास्त्रज्ञ पाठविण्यास
सांगितले.
(d) तंजावरचे राजे सर्फोजी(iv) इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिहीत.

पर्यायी उत्तरे:

(1) (i) (ii) (iii) (iv)(2) (ii) (iii) (i) (iv)
(3) (iv) (ii) (i) (iii)(4) (iii) (i) (iv) (ii)

(2) (ii) (iii) (i) (iv)

2. खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्यातील होते?

(a) खिज्रखान(b) मुबारकशहा
(c) मोहमदशहा(d) अल्लाउद्दीन अलमशहा

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (b) आणि (c) फक्त(2) (b) आणि (c) फक्त
(3) (b), (c) आणि (d) फक्त(4) (a), (b), (c) आणि (d)

(4) (a), (b), (c) आणि (d)

3. जोड्या जुळवा

(a) मयुरभंज (i) मध्यवर्ती राज्यकारभार
(b) कोल्हापूर (ii) मुंबई प्रांतात विलीन
(c) रामपूर (iii) ओरिसात विलीन
(d) भोपाळ (iv) उत्तर प्रदेशात विलीन
(1) (iii) (ii) iv) (i)(2) (i) (ii) (iii) (iv)
(3) (iv) (iii) ii) (i)(4) (iii) (i) (iv) (ii)

(1) (iii) (ii) iv) (i)

4. चुकीची जोडी ओळखा

1) दास्ताबकरो का टापू
(2) सियाराम दल बिहार
(3) परशुराम दल ओरिसा
(4) हिंदूस्तान सोरॉलीस्ट रिपब्लीकन आर्मी उत्तर प्रदेश

(3) परशुराम दल परशुरामसिंग यांच्या नेतृत्वात बिहारमधे कार्यरत होता. आणि सियाराम दल बिहारमध्येच सियाराम सिंग यांच्या नेतृत्वात होता.

5. पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास उद्युक्त केले होते?

(a) कमलादेवी(b) हंसा मेहता(c) रतनबेन मेहता
(d) रामीबाई कामदार(e) लक्ष्मीबाई गर्दै

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (c) आणि (e) फक्त (2) (b), (c), (d) आणि (e) फक्त
(3) (a), (b), (c) आणि (d) फक्त (4) (a), (b), (c), (d) आणि (e)

Option 3

6. पुढे दिलेल्या हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामे व कामाची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा.

(a) गोविंदभाई श्रॉफ(i) अॅक्शन कमिटीचे प्रमुख
(b) एम्. रामचंद्र राव(ii) हैद्राबाद-सिकंदराबाद क्षेत्र
(c) डॉ. मेळकोटे(iii) मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख
(d) दिगंबरराव बिंदू(iv)आंध्र

पर्यायी उत्तरे:

(1) (i) (ii) (iii) (iv)(2) (iv) (i) (ii) (iii)
(3) (iii) (iv) (i) (ii)(4) (iii) (iv) (ii) (i)

(4) (iii) (iv) (ii) (i)

7. पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे?

(a) ते सातारा जिल्ह्यातील काले गावचे होते.

(b) त्यांचे शिक्षण चौथी पर्यन्त झाले होते.

(c) महाराष्ट्रातील जनतेवर त्यांच्या ‘जलशां’ चा खूप परिणाम झाला होता.

(d) ते बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत.

. पर्यायी उत्तरे:

(1) केशवराव विचारे(2) रामचंद्र घाडगे
(3) भाऊराव पाटील(4) कृष्णराव भालेकर

(2) रामचंद्र घाडगे

8. जोड्या जुळवा :

(a) परिक्षीत(i) अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक
(b) जनमेजय(ii) पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते
(c) प्रवहण-जैवाली (iii) प्रसिद्ध तत्त्वज्ञ
(d) जनक(iv) याज्ञवल्क्यांचे संरक्षक

पर्यायी उत्तरे :

(1) (iv) (iii) (ii) (i)(2) (iii) (iv) (i) (ii)
(3) (i) (ii) (iii) (iv)(4) (ii) (i) (iv) (iii)

(3) (i) (ii) (iii) (iv)

9. 23 मे, 1945 रोजी उंबरगाव तालूक्यातील झरी येथील आदिवासींच्या परिषदेत भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले?

(1) कमा रणदिवे(2) गोदावरी परुळेकर
(3) शामराव परुळेकर(4) देवजी तांडेल

(3) शामराव परुळेकर

10. 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलावून त्यांना स्त्रियांच्या केशवपनापासून कोणी परावृत्त केले होते ?

(1) न्यायमूर्ती रानडे(2) महर्षी धोंडो केशव कर्वे
(3) महात्मा ज्योतिबा फुले(4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

(3) महात्मा ज्योतिबा फुले

11. पुढील राज्य काय होती?

(a) माळवा(b) अर्जुनयान(c) योधेय
(d) मद्रक(e) अभिर(f) प्ररर्जून
(g) सनकानीक(h) काक(i) खरपारीक

पर्यायी उत्तरे :

(1) आर्यवर्तातील राज्ये (2) समुद्र गुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये
(3) दख्खनची राज्ये(4) नाग राजांचे प्रदेश

(2) समुद्र गुप्ताला शरण गेलेली टोळींची राज्ये

12. जोड्या जुळवा :

(a) मुकुंद दास(i) स्वदेशी स्टीम नॅव्हीगेशन कंपनी
(b) बा.गं. टिळक(ii) परदेशातील साखरेच्या वापरा विरोधात स्वदेशी चळवळ
(c) लाला लजपत राय(iii) मुंबईच्या गिरणी मालकांनी माफक दरात धोतरे पुरवावीत अशी विनंती
(d) चिदंबरम् पिल्लाई(iv) देशभक्तीपर गीते लिहीली

पर्यायी उत्तरे :

(1) (iv) (ii) (iii) (i)(2) (iv) (iii) (ii) (i)
(3) (i) (ii) (iii) (iv)(4) (ii) (i) (iv) (iii)

(2) (iv) (iii) (ii) (i)

13. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या?

(a) मीर, हाशाम (b) चित्रमणी, अनुपचित्र (c) मुहम्मद हसन (d) फकीर उल्ला

पर्यायी उत्तरे:

(1) (a) आणि (b) फक्त(2) (b) आणि (c) फक्त
(3) (c) आणि (d) फक्त(4) (a), (b) आणि (d) फक्त

(4) (a), (b) आणि (d) फक्त

14. पुढील गोष्टींची कालक्रमानुसार मांडणी करा.

(a) पाकिस्तानचा ठराव (b) राजाजींची योजना काँग्रेसनी फेटाळली (c) राजाजींचे सूत्र (d) सिमला परिषद

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (d), (b), (c)(2) (a), (b), (c), (d)
(3) (b), (a), (d), (c)(4) (c), (b), (a), (d)

(2) (a), (b), (c), (d)

15. इ.स. 75 मध्ये यांनी भारतातील निर्यातीचा संदर्भ असलेला ‘नॅचरल हिस्ट्री’ हा ग्रंथ लिहीला.

(1) प्लिनी(2) हेरॉडॉटस(3) मेगॅस्थेनीस(4) पेरिप्लस

(1) प्लिनी

16. जोड्या लावा :

स्तंभ- I (शहर)स्तंभ – II (नदीच्या काठावर)
बॉन (i) हॉईन (Rhine)
पॅरिस(ii) ऱ्होन (Rhone)
जिनेव्हा (iii) निपर (Dneper)
किव्ह (iv) सिन (Seine)

पर्यायी उत्तरे :

(1) (iv) (ii) (i) (iii)(2) (iv) (ii) (iii) (i)
(3) (ii) (iv) (i) (iii)(4) (iii) (iv) (i) (ii)

(1) (iv) (ii) (i) (iii)

17. पुढील विधाने विचारात घ्या : (a) कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते. (b) धारवाड रखडक श्रेणीमधे लोहखनिज, मँगनिज सापडते. (c) गोंडवना खडक श्रेणीमधे दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो.

पर्यायी उत्तरे:

(1) फक्त विधान (a) बरोबर आहे(2) फक्त विधान (b) बरोबर आहे
(3) विधान (b) आणि (c) बरोबर आहेत(4) विधान (a) , (b) आणि (c) बरोबर आहेत

(4) विधान (a) , (b) आणि (c) बरोबर आहेत

18. जोड्या लावा :

(नदी)(सविस्तर माहिती)
(a) सिंधू (i) छत्तीसगड मधील निमशुष्क उंच प्रदेशात उगम पावते.
(b) तापी(ii) तिबेट मधील मानसरोवराजवळून उगम पावते.
(c) नर्मदा(iii) बेतुल जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते.
(d) कावेरी(iv) मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते.
(v) पश्चिम घाटातील ब्रम्हगिरी पर्वत रांगेतून उगम पावते.

पर्यायी उत्तरे:

(1) (iv) (i) (ii) (v)(2) (iii) (ii) (iv) (v)
(3) (ii) (iv) (v) (i)(4) (ii) (iii) (iv) (v)

(4) (ii) (iii) (iv) (v)

19. खालील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे?

जिल्हाघनतालिंग गुणोत्तर
(a) ठाणे886986
(b) नाशिक393934
(c) नांदेड319943
(d) औरंगाबाद366920

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (b), (d) (2) (a), (c), (d)
(3) (b), (c)(4) (b), (c), (d)

(3) (b), (c)

20. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या ‘इष्टतम लोकसंख्येच्या’ व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा.

(a) बॉलडींग(i) जास्तीत जास्त आर्थिक परतावा
(b) डॅल्टन(ii) राहणीमानाचा दर्जा उंचावणे
(c) पीटरसन(iii) जास्तीत जास्त समाज कल्याण
(d) कार सॉन्डर्स(iv) प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न

पर्यायी उत्तरे :

(1) (iv) (iii) (ii) (i)(2) (ii) (iv) (i) (iii)
(3) (ii) (iii) (iv) (i)(4) (iii) (i) (iv) (ii)

(2) (ii) (iv) (i) (iii)

21. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने पहा.

(a) रेगुर मृदेत अॅल्युमिनियम व लोहाचे प्रमाण भरपूर असते.

(b) जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते.

(c) तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते.

(d) तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त विधान (a) बरोबर आहे.(2) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
(3) विधान (a), (c), (d) बरोबर नाहीत.(4) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

(4) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

22. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा.

(a) बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78° पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत.

(b) भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड व झारखंड ह्या राज्यांतून येतो.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) आणि (b) बरोबर(2) (a) बरोबर (b) चूक
(3) (a) चूक (b) बरोबर(4) (a) आणि (b) चूक

(1) (a) आणि (b) बरोबर

23. उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना _____म्हणतात.

(1) स्थानिक वारे(2) पश्चिमी वारे
(3) व्यापारी वारे(4) डोंगर वारे

(3) व्यापारी वारे

24. महाराष्ट्रामधे शेतजमिनीच्या विभाजनामुळे (तुकडीकरण) काय झाले?

(a) शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही.

(b) शेतजमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

(c) आधुनिक शेती अवजारांचा आर्थिक दृष्ट्या उपयोग परवडत नाही.

(d) शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त विधन (a) बरोबर आहे.

(2) विधान (a) आणि (b) बरोबर आहेत.

(3) विधान (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

(4) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

(4) विधान (a), (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.

25. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागले जातात. त्यांचा योग्य पर्याय निवडा.

(a) भूखंड मंच (b) भूखंड उतार(c) भूखंड कटक आणि पर्वत
(d) मध्यम-खोल सागरी पठार (e) खोल सागरी मैदान(f) सागरी डोह

पर्यायी उत्तरे :

(1) केवळ (a), (b), (c) आणि (e)

(2) केवळ (a), (b), (e) आणि (f)

(3) केवळ (a), (b), (d) आणि (f)

(4) केवळ (b), (c), (d), (e) आणि (f)

(2) केवळ (a), (b), (e) आणि (f)

26. जोड्या जुळवा :

धारवाड खडक श्रेणीविभाग
(a) चैंपियन श्रेणी(i) सिंगभूम, बोनाई
(b) चिल्पी श्रेणी(ii) दिल्ली, अलवर
(c) रिअलो श्रेणी(iii) कोलार, रायचूर
(d) आयर्न-ओर श्रेणी (iv) बालाघाट, जबलपूर
(1) (iii) (iv) (ii) (i)(2) (iv) (iii) (ii) (i)
(3) (ii) (i) (iii) (iv)(4) (i) (ii) (iv) (iii)

(1) (iii) (iv) (ii) (i)

27. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम ओळखा.

(1) शहादा, धडगाव, अक्कलकुवा(2) धडगाव, तळोदा, नंदुरबार
(3) नवापूर, नंदुरबार, धडगाव(4) अक्कलकुवा, धडगाव, नंदुरबार

(2) धडगाव, तळोदा, नंदुरबार

28. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे बारा अशी असेल, तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रिनीच व आंतरराष्ट्रीय वार रेषा या

रेखावृत्तावर वेळ काय असेल?

(1) सकाळ 6:30 व सायंकाळ 6:30(2) सायंकाळ 6:30 व सकाळ 6:30
(3) सकाळ 6:30 व सायंकाळ 5:30(4) सायंकाळ 6:30 व सकाळ 5:30

(1) सकाळ 6:30 व सायंकाळ 6:30

29. भारतामधे मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे?

(a) भूमीखंडाचा विस्तृत भाग

(b) भारताच्या तिन्ही बाजुस असलेला समुद्र

(c) 30 ते 40° अक्षांसाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व

(1) फक्त (a)(2) फक्त (b)
(3) (a) आणि (b)(4) (a), (b) आणि (c)
पर्यायी उत्तरे :

(4) (a), (b) आणि (c)

30. चिनूक वायासंदभातील कोणती विधाने बरोबर नाहीत?

(a) हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात.

(b) हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत.

(c) हे वारे आल्पस पर्वताच्या दक्षिण बाजुवरून वर चढतात.

(d) हे वारे हाइन नदीखोऱ्यातून वाहतात.

(1) (a), (b)(2) (a), (c)
(3) (b), (c)(4) (c), (d)
पर्यायी उत्तरे :

(4) (c), (d)

31. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 च्या फार पुर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले?

(1) आशियातील चित्ता (2) आशियातील हत्ती
(3) वाळवंटातील कोल्हा (4) गंगेतील डॉल्फीन

(1) आशियातील चित्ता

32. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते?

(a) निर्वणीकरण(b) दलदलींचे पुनःप्रापण
(c) जमिनीच्या वापरात होणारे बदल(d) उदरनिर्वाह शेती

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त (a), (b) आणि (d)(2) फक्त (a), (b) आणि (c)
(3) फक्त (a)(4) वरील सर्व

(2) फक्त (a), (b) आणि (c)

33. जोड्या लावा :

स्तंभ – I (नॅशनल पार्क)स्तंभ –II (राज्य)
(a) नरमधाफा (i) गोवा
(b) भगवान महावीर(ii) उत्तराखंड
(c) सिमलीपाल(iii) अरुणाचल प्रदेश
(d) दुधवा(iv) ओडीशा
(1) (ii) (iv) (iii) (i)(2) (i) (iii) (iv) (ii)(3) (iii) (i) (ii) (iv)(4) (iii) (i) (iv) (ii)

प्रश्न रद्द झालाय

34. जोड्या लावा

स्तंभ – I (आवाजाची पातळी)
स्तंभ – II (कार्य)
(a) 100 dB(i) झोपेत अडथळा
(b) 40 dB(ii) कार्यक्षमतेची हानी
(c) 70dB(iii) कायमची श्रवण शमतेची हानी
(d) 90 dB(iv) भाषणात व्यत्यय
(1) (iii) (i) ii) (iv) (2) (iii) (i) (iv) (ii)
(3) (i) (iii) (iv) (ii)(4) (iv) (ii) (iii) (i)

(2) (iii) (i) (iv) (ii)

35. जोड्या लावा

स्तंभ – I (प्राणी जाती)स्तंभ – II (महत्व)
(a) किटक(i) किटकांना खातो
(b) सर्प(ii) पीक परागकण वाहक
(c) बेडूक(iii) जमिनीची सुपीकता
(d) गांडूळ(iv) उंदरांपासुन संरक्षण

पर्यायी उत्तरे :

(1) (ii) (iv) (i) (iii)(2) (ii) (iv) (iii) (i)
(3) (iii) (iv) (i) (ii)(4) (iv) (i) (iii) (ii)

(1) (ii) (iv) (i) (iii)

36. नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार (तज्ञ गट पद्धती) लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यासंदर्भात खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?

(a) 1983-84 मध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य 46.6 टक्के इतके होते.

(b) 1993-14 मध्ये 36.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.

(c) 1990-91 मध्ये 35.0 टक्के लोकसंख्या शहरी भागात दारिद्र्य रेषेखाली होती.

(d) 1987-88 मध्ये भारतात एकूण 37.0 टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) आणि (c)(2) (b) आणि (d)
(3) (a) आणि (b)(4) (c) फक्त

प्रश्न रद्द झाला आहे

37. “अदृश्य” मुली व महिला’ ही संकल्पनात्मक स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे होते ?

(a) मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता/हव्यास

(b) अपुरी सांख्यिकी माहिती (c) महिलांचा होणारा बाजार

(d) उच्च माता मृत्यु दर

पर्यायी उत्तरे :

(1) (a) आणि (d)(2) (a), (b), (c) आणि (d)
(3) (a), (c) आणि (d)(4) (a), (b) आणि (d)

(1) (a) आणि (d)

38. ‘संसद आदर्श ग्राम योजना’ (SAGY) बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(1) सप्टेंबर 2016 मध्ये सादर करण्यात आली.

(2) खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल व्हिलेज विकसित करू शकतात.

(3) या मध्ये भारतातील 2,500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत.

(4) वरीलपैकी एकही नाही.

Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi launched Saansad Adarsh Gram Yojana (SAGY) on 11th October, 2014 on the birth anniversary of Lok Nayak Jai Prakash Narayan at Vigyan Bhawan, New Delhi

39. सन 2018 चा भारताचा SDG निर्देशांक हे दर्शवितो :

(a) भारताचा सरासरी निर्देशांक 57 आहे.

(b) महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट आहे.

(c) उत्तर प्रदेश राज्याचा समावेश ‘उत्तम’ या गटात होतो.

पर्यायी उत्तरे :

1.फक्त (a) बरोबर2.फक्त (b) बरोबर
3.फक्त (a) आणि (b) बरोबर4.फक्त (b) आणि (c) बरोबर

1.फक्त (a) बरोबर

40. GATT (जनरल अॅग्रीमेंट ऑन ट्रेड अॅन्ड टॅरिफ्स) संबंधात पुढील विधाने विचारात घ्या.

(a) गॅट (GATT) ची स्थापना 1948 साली झाली.

(b) सुरवातीच्या काळात गॅट (GATT) चे 23 देश सदस्य होते.

(c) WTO गॅट (GATT) चे एक प्रकारे उत्तराधिकारी आहे.

(d) द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापार कराराचे ‘गॅट’ हे प्रशासन करते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

(1) (a) आणि (d)

(2) (a), (b) आणि (d)

(3) (a), (b) आणि (c)

(4) वरीलपैकी सर्व

(3) (a), (b) आणि (c)

41. पुढीलपैकी कोणते/ती वधान/ने बरोबर आहे/त?

(a) राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला.

(b) त्याअंतर्गत वय 9 वर्षे -14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक/मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

(c) त्याअंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते.

पर्यायी उत्तरे:

(1) (a) फक्त(2) (b) फक्त
(3) (a) आणि (b) फक्त(4) वरील सर्व

(4) वरील सर्व

42. जोड्या लावा

गट – अ
(आर्थिक सुधारणा)
गट-ब (उद्दिष्ट्ये)
(a) विमुद्रीकरण(i) काळ्या पैशाचे नियंत्रण
(b) नवा बेनामी कायदा(ii) खोटे चलन निष्कासित करणे
(c) दिवाळखोरी कायदा(iii) अनुदानांचे तर्काधिष्टीकरण
(d) आधार कायदा(iv) व्यवसाय सरलतेस प्रवर्तित करणे

पर्यायी उत्तरे:

(1) (iv) (iii) (ii) (i)(2) (ii) (i) (iv) (iii)
(3) (ii) (i) (iii) (iv)(4) (i) (ii) (iii) (iv)

(2) (ii) (i) (iv) (iii)

43. खालील विधाने विचारात घ्या :

(a) मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे.

(b) राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केले जाते.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) फक्त बरोबर आहे
(2) (b) फक्त बरोबर आहे
(3) (a) आणि (b) दोन्हीही बरोबर आहेत
(4) (a) आणि (b) दोन्हीही चूक आहेत

(1) (a) फक्त बरोबर आहे

44. प्रधानमंत्री जन धन योजना यासाठी सुरू केली गेली.

(a) वित्तीय समावेशन

(b) वित्तीय साक्षरता

(c) विम्याचे कवच

(d) पीक विमा

पर्यायी उत्तरे :

(1) (a) व (b) फक्त(2) (b) व (c) फक्त
(3) (a), (b) व (c) फक्त(4) (b), (c) व (d) फक्त

(3) (a), (b) व (c) फक्त

45. खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारतीय नियोजन आयोगाची जागा निती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे.

(b) प्रमाणक स्थापक (नॉर्मेटीव्ह) नियोजन हे निती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) फक्त बरोबर(2) (b) फक्त बरोबर
(3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर(4) (a) आणि (b) दोन्ही चूक

(3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर

46. ‘आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(1) युती 121 सौर संसाधन समृद्ध देशांची आहे.

(2) हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये अंशता व पूर्ण समाविष्ट आहेत.

(3) भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तपणे युती सुरू केली होती.

(4) युती 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली गेली.

(2) हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये अंशता व पूर्ण समाविष्ट आहेत.

47. पुढील विधाने विचारात घ्या :

(a) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-2008 मध्ये सुरू करण्यात आले.

(b) तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढविणे हा त्याचा हेतू आहे.

पर्यायी उत्तरे :

(1) फक्त (a) बरोबर आहे(2) फक्त (b) बरोबर आहे
(3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत(4) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत

(3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत

48. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे/ची (PMUY) उद्दीष्ट्य/ष्ट्ये :

(a) महिला व मुलांच्या आरोग्यात सुधारणा (b) महिला सक्षमीकरण

(c) अतिरिक्त रोजगारनिर्मिती

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b) फक्त(2) (b), (c) फक्त
(3) (a) फक्त(4) वरीलपैकी तीनही

(3) (a) फक्त

49. ‘भारत-अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान’ उपक्रम कोणत्या वर्षी सुरू (Launch) करण्यात आला?

(1) 2004(2) 2000(3) 2009(4) 2005

(1) 2004

50. खालीलपैकी कोणते विधान/विधाने अयोग्य आहे/आहेत?

(a) विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल

राष्ट्रीय उत्पादन (GNP) होय.

(b) उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो, परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो. त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय

उत्पादनात (GNP) केला जातो.

(c) प्रति माणसो उत्पन्न हे देशातील लोकांचे सीमांत उत्पन्न दर्शविते.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) आणि (b)(2) (a) आणि (c)
(3) (b) आणि (c)(4) वरील तीनही विधाने बरोबर आहेत

(3) (b) आणि (c)

51. पुढील विधानांचा विचार करा :

(a) दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते.

(b) म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते.

पर्यायी उत्तरे:

(1) दोन्ही विधाने चूक आहेत.(2) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा आहे.
(3) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा नाही.(4) (a) बरोबर परंतु (b) चूक आहे.

(2) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा आहे.

52. जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे :

(1) 180 अंशानी (1) अवस्था संकुचीत होईल.

(2) अवस्था बदल होणार नाही.

(3) 90 अंशानी (1/2) अवस्था विरलन होईल.

(4) विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही.

(2) अवस्था बदल होणार नाही.

53. खालील विधानांचा विचार करा :

(a) मृत प्राणी अथवा वनस्पती यांचेमध्ये कार्बन – 14 ते कार्बन – 12 यांचे गुणोत्तर बदलत असते.

(b) किरणोत्सारी कार्बन – 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात.

पर्यायी उत्तरे :

1. विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमिमांसा आहे.

2. (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.

3. (a) विधान सत्य आहे परंतु (b) चूक आहे.

4. (a) आणि (b) एकमेकांशी संबंधित नाहीत.

1. विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमिमांसा आहे.

54. थॉम्पसनच्या अणू प्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात?

(1) एकूण अणूची तटस्थता

(2) हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती Spectra of hydrogen atom

(3) इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन चे अणूमधील स्थान

(4) अणूची स्थिरता

(1) एकूण अणूची तटस्थता

55. ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षांनंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश

अक्षय शिल्लक राहील?

(1) 0 (शून्य)

(2) 0.5

(3) 0.25

(4) 0.125

(3) 0.25

56. 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर ₹ 3.00 असेल, तर मार्च

महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती?

(1) ₹279.00

(2) ₹ 31.00

(3) ₹ 27.00

(4) ₹27.90

(4) ₹27.90

57. योग्य पर्याय ओळखुन जोड्या लावा.

(a) संपुष्टात न येणारी संसाधने(i) मानवनिर्मीत कृत्ये
(b) स्ट्रॅटोस्फीयर(ii) जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल
(c) अपुनरावर्ती/पुनर्नुतनीकरणास अयोग्य(iii) सौर ऊर्जा
संसाधने किंवा अनुतनावर्ती संसाधने
(d) क्लोरोफ्लुरोकार्बनस्(iv) ओझोनचा दाट थर

पर्यायी उत्तरे :

(1) (iv) (iii) (ii) (i)(2) (iv) (ii) (iii) (i)
(3) (iii) (iv) (ii) (i)(4) (ii) (iii) (iv) (i)

(3) (iii) (iv) (ii) (i)

58. “सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारांत वाढत्या प्रमाणात मागणी आहे.”

वरील विधान निम्न निर्देशील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक “वरील विधानाच्या” संदर्भाने संयुक्तीक नाही. संयुक्तीक नसलेले कारण ओळखा.

(1) फुलांमध्ये नैसर्गिकरीत्या अॅन्टीऑक्सीडंट व अपमार्जन (ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सीजन अपमार्जन करण्याची क्षमता) कार्यक्षमता असते.

(2) फुलांमध्ये “अन्थोसायनीन” प्रचुर प्रमाणांत असते.

(3) फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.

(4) फुलं महत्वाची जीवनसत्वे व खनीजांचा (मिनरल्स) स्रोत आहे.

(3) फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.

59. पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा.

(a) बायोस्फीअर(i) महासागर, समुद्र, नद्या, तळे ई.
(b) लीथोस्फीअर(ii) वनस्पती, प्राणी, सुक्ष्मजीव ई
(c) हायड्रोस्फीअर(iii) पृथ्वीच्या सभोवतालचे, वायु आवरण
(d) अॅटमॉस्फीयर(iv) पृथ्वीचा घन (खडकांचा) घटक

पर्यायी उत्तरे :

(1) (iii) (ii) (i) (iv)(2) (iv) (iii) (ii) (i)
(3) (ii) (iv) (i) (iii)(4) (iii) (ii) (iv) (i)

(3) (ii) (iv) (i) (iii)

60. ______is an Artificial method of Asexual Reproduction, used to produce plants, combining desired stem with favourable Root Characteristic.

(1) Budding

(2) Layering

(3) Cutting

(4) Grafting

(4) Grafting

61. खालील जोड्या जुळवा (योग्य पर्याय निवडा) :

(a) अॅरिस्टॉटल(i) औषधशास्त्राचा जनक
(b) थिओफ्रास्टस(ii) अनुवांशिकशास्त्राचा जनक
(c) हिप्पोक्रेट्स(iii) वनस्पतीशास्त्राचा जनक
(d) ग्रेगर जोहान मेंडेल(iv) जीवशास्त्राचा जनक

पर्यायी उत्तरे:

(1) (ii) (i) (iv) (iii)(2) (iii) (ii) (iv) (i)
(3) (iv) (iii) (i) (ii)(4) (i) (ii) (iv) (iii)

(3) (iv) (iii) (i) (ii)

62. खालीलपैकी कोणती विधान/विधाने “सारकोमेअर” बद्दल सत्य आहे/आहेत?

(a) सारकोमेअर हे कोणत्याही तंतुचे खंड आहेत.

(b) ते उतकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचे भाग आहेत.

पर्यायी उत्तरे :

(1) (a) फक्त

(2) (b) फक्त

(3) (a) आणि (b) दोन्ही

(4) वरीलपैकी कोणतेही नाही.

(3) (a) आणि (b) दोन्ही

63. खालीलपैकी कोणता प्रोटोझुअन रोग/आजार “टिसी टिसी’ माशी चावल्यामुळे होतो?

(1) स्लीपींग सिकनेस्

(2) दिल्ली बोली

(3) काला आझार

(4) चागास् रोग

(1) स्लीपींग सिकनेस्

64. कोशिकांचे (Cells) सर्वप्रथम वर्णन कोणी केले?

(1) लॅमार्क(2) स्श्वान
(3) रॉबर्ट हुक(4) रूडॉल्फ विरचौ

(3) रॉबर्ट हुक

65. खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडिकरण क्षपण या प्रकारात मोडतात?

(a) 2Mg + 02 → 2Mgo

(b) MnO2 + 4HCl → MnCl2 + 2H,0+ Cl2

(c) 2Na + Cl–> 2NaCl

(d) 2NaBr + H2O2 → 2NaOH + Br2

पर्यायी उत्तरे:

(1) फक्त (a), (d)(2) फक्त (b), (c)
(3) फक्त (a), (b)(4) वरील सर्व

(4) वरील सर्व

66. समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, पेशीत आणि ऊतीत K+ आयनाची संहती _______ आणि Na+ आयनांची संहती______ असते.

(1) कमी, अधिक(2) कमी, कमी
(3) अधिक, कमी(4) अधिक, अधिक

(3) अधिक, कमी

67. रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते, जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा ___असतो.

The EMF of a chemical cell is positive, when the free energy change of the reaction is __

(1) > 0(2) <0
(3) =0(4) मुक्त ऊर्जा बदल आणि विद्युतगामक बलाचा संबंध नाही

(2) <0

68. आधुनिक आवर्तसारणीतील अणुची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

(a) वरुन खाली जाताना वाढते.

(b) वरुन खाली जाताना कमी होते.

(c) डावीकडून उजवीकडे जाताना वाढते.

(d) डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (d)(2) (a), (c)
(3) (b), (d)(4) (b), (c)

(1) (a), (d)

69. खालीलपैकी कोणास टरपिनॉइड समजले जातात?

(1) फक्त मेंथॉल

(2) फक्त अ जीवनसत्व

(3) दोन्ही, मेंथॉल आणि अ जीवनसत्व

(4) दोन्हीही नाही

(3) दोन्ही, मेंथॉल आणि अ जीवनसत्व

70. टेट्राहेड्रल [Ni(CO)4 व्यामिश्रां/जटिल (complex) मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची (Unpaired electrons) संख्या____आहे.

(l) 0

(2) 1

(3) 2

(4) 3

(l) 0

71. मंत्रिमंडळ सचिवालयाच्या (Cabinet Secretariat) संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

(a) ते इ.स. 1950 मध्ये स्थापन करण्यात आले.

(b) ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते.

(c) ते रेषा संघटन : (Line agency) आहे.

(d) ते केन्द्र सरकार मध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते.

पर्याची उत्तरे:

(1) (a) आणि (b)(2) (a), (b) आणि (c)
(3) (b) आणि (d)(4) (a), (c) आणि (d)

(3) (b) आणि (d)

72. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.

(a) भारतात, घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने संसदेमध्ये मांडले जावू शकते.

(b) अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान दोन-तृतीयांश घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक

असते.

(c) स्विझर्लंड मध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येवू शकत नाही.

(d) ऑस्ट्रेलियात, र ज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो.

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (b), (c)(2) (b), (c), (d)
(3) फक्त (a) आपि (b)(4) फक्त (c) आणि (d)

(4) फक्त (c) आणि (d)

73. लोकसभेच्या सभापतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या.

(a) त्याचे/तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जाते.

(b) त्यास/तिला समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही.

(c) त्यास/तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरुन दूर

करता येते.

(d) त्याचे/तिचे स्थान उप-पंतप्रधानापेक्षा वरचे आहे.

वरील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत?

(1) (a), (b), (c)(2) (b), (c), (d)
(3) (a) आणि (b)(4) वरील सर्व

(3) (a) आणि (b)

74. खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रितीने जुळत नाहीत?

(a) लक्षवेधी सूचनातातडीच्या, सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष
वेधणे
(b) स्थगन प्रस्तावसभागृह मुदत (वेळ) संपण्यापुर्वी स्थगित करणे.
(c) हक्कभंग प्रस्तावसभागृहाची कार्यवाही जेंव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत
नसेल तेंव्हा त्याकडे सभापतीचे लक्ष वेधणे.
(d) हरकतीचा मुद्दामंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या/अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधणे.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b) (2) (a), (c)
(3) (b), (c), (d)(4) (a), (d)

(3) (b), (c), (d)

75. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(1) राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जावू शकत

नाही.

(2) राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापुर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठविले पाहिजे.

(3) संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते.

(4) राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार (मत) स्विकारण्याचे बंधन संसदेवर नसते.

(3) संसद साध्या बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते.

76. केन्द्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(1) ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि पाच पेक्षा जास्त नाहीत इतके माहिती

आयुक्त अस्तात.

(2) मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरुन

राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

(3) ते आपले पट पाच वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात.

(4) ते पुर्ननियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूकीस पात्र असतात परंतू ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण पाच वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत.

Option 3

77.______ या परिस्थितीमुळे ‘न्यायिक सक्रियतेला’ चालना मिळते.

(a) जेंव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल होतात.

(b) अधांतरी (Hung) विधिमंडळ असतांना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते.

(c) जेंव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यांत अपयशी ठरते.

(d) जेंव्हा सत्तारुढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्दिष्टांसाठी न्यायालयांचा दुरुपयोग करतात.

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (b), (c)(2) (b), (c), (d)
(3) वरील सर्व(4) फक्त (b) आणि (c)

(3) वरील सर्व

78. खालील तरतूदी विचारात घ्या.

(a) शेषाधिकार हे केन्द्र शासनाकडे आहेत.

(b) अधिकारांची विभागणी ही घटक राज्ये आणि केन्द्र शासनामध्ये केली आहे.

(c) राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकांवर निर्णायक (संपूर्ण) नकाराधिकार वापरतात.

(d) केन्द्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते.

वरीलपैकी कोणत्या तरतूद/तरतूदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती?

(1) फक्त (a)(2) (a), (c) आणि (d)
(3) (b), (c) आणि (d)(4) वरील सर्व

(2) (a), (c) आणि (d)

79. खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतर-राज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे?

(1) राज्या-राज्यांमध्ये जे तंटे उद्भवले असतील त्या बाबत चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे.

(2) कोणत्याही आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णया

करता तरतूद करणे.

(3) राज्यांपैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघ-राज्य व एक किंवा अधिक राज्ये यांचा ज्यात समाईक हितसंबंध

आहे अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे.

(4) अशा कोणत्य ही विषयावर शिफारशी आणि, विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक

चांगल्या प्रकार समन्वय साधण्याकरिता शिफारशी करणे.

Option 2

80. ‘विशेषाधिकार समिती’ संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(1) लोकसभेचा नियम-222 आणि राज्यसभेचा नियम-187 हे विशेषाधिकारासंबंधी आहेत.

(2) लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेषाधिकार समिती ही सभापती नामनिर्देशित करतात.

(3) राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समितीचे प्रमुख असतात ज्या समितीत 15 सदस्य असतात.

(4) वरीलपैकी एकही नाही.

Option 3

81. ‘राष्ट्रीय युवक धोरणा’ बाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्विकार 1986 मध्ये करण्यात आला.

(b) 2003 मधील धोरणानुसार युवकाची व्याख्या 15-35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली.

(c) 2014 मधील धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15-29 वर्षे अशी केली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(1) फक्त (a)(2) (a) आणि (b)
(3) (b) आणि (c)(4) फक्त (c)

Option 4

82. खालीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे/त?

(a) राज्यघटनेचे अनुच्छेद-111 हे अर्थ विधेयकांच्या (money bills) व्याख्येच्या संदर्भात आहे.

(b) अनुच्छेद-117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक (financial bill) हे केवळ लोकसभेमध्येच मांडले

जावू शकते.

(c) अनुच्छेद-117(1) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक (financial bill) राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त

करू शकत नाही.

पर्यायी उत्तरे:

(1) फक्त (a)(2) (b) आणि (c)
(3) वरीलपैकी एकही नाही(4) फक्त (c)

(3)वरीलपैकी एकही नाही

83. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(1) अनुच्छेद 200. अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात.

(2) राष्ट्रपती विधेयक पुर्विचारासाठी राज्यविधिमंडळाकडे परत पाठविण्यास राज्यपालास निर्देश देवू शकतात.

(3) जर ते विधेयक राज्यविधिमंडळाने पुन्हां दुरुस्तीसह अथवा दुरुस्ती शिवाय मंजूर करून पुन्हां राष्ट्रपतीकडे सादर

केल्यास त्यास मंजूरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते.

(4) राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्य घटनेने कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही.

Option 3

84. उच्च न्यायालयाचा न्यायधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे?

(1) ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात दहा वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे.

(2) त्या व्यक्तिने उच्च न्यायालयात दहा वर्षे वकिली केलेली असली पाहिजे.

(3) राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे.

(4) वरीलपैकी एकही नाही.

Option 3

85. ‘राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याहीनागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही’. ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे?

(1) 30(2) 16(3) 28(4) 29

Option 4

86. भारताच्या गगनयान मोहिमे विषयी अयोग्य विधाने शोधा :

(a) गगनयान साठी भारतीय हवाई सेनेच्या चार वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

(b) त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागरीन कॉस्मोनेट सेंटर येथे होणार आहे.

(c) या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014 मध्ये केली होती.

(d) याचे नियोजन 2022 साठी पाच सदस्यांचे चमू एक महिन्याचे अंतराळातील वास्तव्या यासाठी करण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (b), (c), (d)
(3) (c), (d)(4) (b), (c)

(3) (c), (d)

87. जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहिन प्राणी ______आहे.

(1) आक्टोपस

(2) कटल फिश

(3) कोलोस्सल स्क्वीड

(4) जायंट स्क्वीड

(3) कोलोस्सल स्क्वीड

88. टाईम या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाने ‘टाईम पर्सन ऑफ द इयर, 2019’ साठी खालीलपैकी कोणाची निवड

केली?

(1) ग्रेटा थनबर्ग

(2) मलाला युसूफजाई

(3) ऋषी जोशी

(4) केट विन्सलेट

(1) ग्रेटा थनबर्ग

89. खालील कथने लक्षात घ्या :

(a) डिसेंबर 2017 मध्ये इराणी राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांच्या हस्ते छबाहार बंदराच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

झाले.

(b) मोक्याच्या छबाहार बंदराच्या कामकाजाबाबत भारताद्वारे कृती करण्यात आली. सीमा क्षेत्राच्या बाहेर बंदर बनविण्य ची ही भारताची पहिली वेळ असेल.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत?

(1) फक्त (a)

(2) फक्त (b)

(3) (a) आगि (b) दोन्ही

(4) (a) आणि (b) दोन्ही नाही

Option 4

90. भारताच्या राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेची उद्दिष्टे आहेत :

(a) कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षीक योजनांचे समर्थन करणे.

(b) सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन करणे.

(c) विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे.

(d) उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातुन महिलांचे सक्षमीकरण करणे.

पर्यायी उत्तरे:

(1) फक्त (a), (b), (c)(2) फक्त (b), (c), (d)
(3) फक्त (a), (b), (d)(4) फक्त (a), (c), (d)

(1) फक्त (a), (b), (c)

91. योग्य कथन/ने ओळखा – ( 15 वा वित्त आयोगा बाबत) :

(a) एन.के. सिंग हे आयोगाचे अध्यक्ष आहेत.

(b) अरविंद मेहता हे आयोगाचे सदस्य आहेत.

(c) डॉ. अनुप सिंग हे आयोगाचे सचिव आहेत.

पर्यायी उत्तरे:

(1) फक्त (a)(2) फक्त (a) आणि (b)
(3) फक्त (b) आणि (c)(4) फक्त (c)

Option 1

92. आरे दुग्ध वसाहती विषयी योग्य विधाने शोधा :

(a) ही वसाहत 1946 मध्ये तयार झाली.

(b) आरे वसाहतीचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरूंनी केले होते.

(c) आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली.

(d) याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली.

पर्यायी उत्तरे:

(1) (a), (b), (c), (d)(2) (b), (c), (d)
(3) (b), (c)(4) (b), (d)

(2) (b), (c), (d)

93. भारतातील प्रतोद विषयी योग्य विधाने निवडा :

(ai कायदे मंडळातील सभागृहात पक्षांतील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो.

(b) भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतली आहे.

(c) अतिरिक्त प्रते दाच्या सहाय्यसह एक मुख्य प्रतोद असतो.

(d) राष्ट्रपतींच्या निवडणूकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रितीने मत देण्यासाठी निर्देशीत करू

शकत नाही.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (a), (b), (c)
(3) (a), (c)(4) (a), (b), (d)

(1) (a), (b), (c), (d)

94. कोणत्या भारतीय गोलंदाजांनी 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय हॅट-ट्रिक प्राप्त केली?

(a) कुलदिप यादव

(b) मोहम्मद शमी

(c) जसप्रीत बुमराह

(d) रविंद्र जडेजा

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c)(2) (b), (c), (d)
(3) (a), (b), (d)(4) (a), (c), (d)

Option 1

95. अॅमेझॉन जंगला विषयी योग्य विधान शोधा.

(a) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे.

(b) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे.

(c) या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापला आहे.

(d) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्कीमर्स आहेत.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (a), (b), (c)
(3) (a), (d)(4) (a), (b), (d)

(4) (a), (b), (d)

96. खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात 2019 मध्ये कोणता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला?

(1) फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार

(2) मतदानाचा अधिकार

(3) कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार

(4) घटस्फोटाचा अधिकार

Option 1

97. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 2019 साठी बालक अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे याला ‘नाळ’ या मराठी सिनेमासाठी

गौरवण्यात आले खालीलपैकी या सिनेमाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?

(1) अंकुश चौधरी(2) नागराज मंजुळे
(3) सुधाकर रेड्डी एक्कंती(4) गार्गी कुलकर्णी

Option 3

98. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा :

(a) 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2019 देण्यात आले.

(b) हे पुरस्कार चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाहीत.

(c) मराठी लेखिका अनुराधा पाटील यांना त्यांच्या लघुकथा लेखनासाठी पुरस्कार 2019 मध्ये मिळाला.

(d) इंग्रजी मध्ये श्री. शशी थरुर यांच्या पुस्तकास 2019 मध्ये पुरस्कार मिळाला.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (a), (b)
(3) (b), (c)(4) (a), (b), (c)

Option 4

99. भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांका विषयी योग्य विधाने शोधा :

(a) हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो.

(b) जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते.

(c) भारतात 500 गुणांचा/बिंदूंचे प्रमाण वापरतात.

(d) हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदुषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (a), (b), (c)
(3) (b), (c)(4) (b), (c), (d)

Option 1

100. महाराष्ट्र व कर्नाटक यांतील सीमाविवादा विषयी अयोग्य विधाने शोधा.

(a) बेळगाव वर भाषेच्या आधारावर महाराष्ट्राने आपला दावा केलेला आहे.

(b) बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी हैद्राबाद संस्थानाचा भाग होते.

(c) सध्या बेळगाव हा कर्नाटक मधील जिल्हा आहे.

(d) गेली अनेक वर्षापासून बेळगावचा सीमा प्रश्न विवाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b), (c), (d)(2) (b), (c)
(3) (b), (d)(4) (a), (b), (d)

Option 3

Leave a Comment